शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदू पाकिस्तान' विधानावर शशी थरुर ठाम; भाजपा-काँग्रेसमध्ये घमासान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:47 IST

शशी थरुर यांच्या विधानावर भाजपाची जोरदार टीका

नवी दिल्ली : 'हिंदू पाकिस्तान' विधानावरुन भाजपानं काँग्रेस खासदार शशी थरुर यांना लक्ष्य केलं आहे. अल्पसंख्यांकांच्या मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून थरुर यांनी हिंदूंची बदनामी केल्याची टीका भाजपानं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान साधण्यासाठी काँग्रेसकडून लोकशाहीवर हल्ला केला जात असल्याचं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. थरुर यांचं विधान हा हिंदूंवरील हल्ला असल्याचंही ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणूक भाजपानं जिंकल्यास भारताचा हिंदू पाकिस्तान होईल, असं शशी थरुर काल तिरुअनंतपुरममधील एका कार्यक्रमात म्हणाले होते. थरुर यांच्या विधानावर भाजपानं सडकून टीका केली. मात्र काँग्रेसच्या एकाही नेत्यानं थरुर यांची बाजू मांडलेली नाही. शशी थरुर त्यांच्या विधानावर ठाम आहेत. उलट त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भाजपावरील हल्ला आणखी तीव्र केला आहे. 'मी आधीही हे म्हटलं आहे आणि मी पुन्हा तेच म्हणेन. पाकिस्तानचा जन्म एका विशेष धर्माच्या लोकांसाठी झाला. पाकिस्तानमध्ये कायम अल्पसंख्यांकांना अधिकार नाकारण्यात आले. त्यांनी कायम अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव केला. भारतानं कधीच असं केलं नाही. भारतानं धर्माच्या आधारे कधीही कोणासोबत भेदभाव केला नाही,' असं थरुर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

शशी थरुर यांनी भाजपा आणि संघावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'संघ आणि भाजपाचा हिंदू राष्ट्राचा विचार पाकिस्तानच्या विचारसरणीचं प्रतिबिंब आहे. ज्या देशात बहुसंख्यांकांना महत्त्व दिलं जाईल आणि अल्पसंख्यांकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात येईल, तो देश हिंदू पाकिस्तान असेल. आम्ही यासाठी स्वातंत्र्य लढा दिला नव्हता. भारताची अशी व्याख्या आपल्या घटनेनंदेखील केलेली नाही,' असं थरुर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी