congress mp shashi tharoor says saffron is a glorious indian color | भारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर

भारताचा भगवा रंग गौरवशाली- शशी थरूर

चेन्नईः काँग्रेसचे लोकसभेतील खासदार शशी थरूर भारतीय क्रिकेट टीमवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. आयसीसीनं टीम इंडियाला भगव्या रंगाची जर्सी परिधान करण्यास दिलेल्या परवानगीवर थरुर म्हणाले, भारताचा भगवा रंग गौरवशाली आहे. सामन्यादरम्यान टीम इंडियाचं समर्थन करण्यासाठी त्यांनीही भगव्या रंगाचं चॅकेट घातलं होतं. जेव्हा दोन संघांची जर्सी एकसारखी होते, तेव्हा एका टीमच्या जर्सीचा रंग बदलावा लागतो. भारतानं स्वतःच्यासाठी भगव्या आणि निळ्या रंगांच्या जर्सीची निवड केल्याचं योग्यच असल्याचं थरुर म्हणाले आहेत.

थरुर म्हणाले, इंग्लंडच्याविरोधातील सामन्यात भारताचं समर्थन करण्यासाठी निळ्या पॉकिटचं भगवं जॅकेट परिधान केलं होतं.  
 भाजपाचं भगव्या रंगाशी असलेलं नातं पाहून काही विरोधकांना भगव्या रंगाची जर्सी खटकली आहे. परंतु, या भगव्या रंगाचा भाजपा किंवा अन्य कुठल्याही संघटनेशी-पक्षाशी काही संबंध नसल्याचं आयसीसीमधील एका सूत्रानं एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीतून स्पष्ट झालं आहे. हा 'ऑरेंज' नेमका कुठून आला, याबाबतही त्यानं खुलासा केला आहे.

'टीम इंडियाची नवी जर्सी अमेरिकेतील डिझायनर्सनी तयार केली आहे. हे डिझाइन करताना, चाहत्यांना अगदीच वेगळं, अनोळखी वाटू नये, असा विचार झाला. टीम इंडियाच्या जुन्या टी-२० जर्सीमध्ये ऑरेंज पट्ट्या आहेत. सध्याच्या जर्सीची कॉलर आणि त्यावरचं 'इंडिया' हे नावही ऑरेंज रंगात आहे. त्यामुळे या रंगसंगतीत थोडी अदलाबदल करून डिझाइन्स केली गेली. ती बीसीसीआयला पाठवण्यात आली आणि त्यांनी सर्वोत्तम डिझाइन निवडलं', असं आयसीसीतील सूत्राने एएनआयला सांगितलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress mp shashi tharoor says saffron is a glorious indian color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.