शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

'रात्रभर इंटरनेट बंद करूनही माझा डेटा संपला'; संसदेत उपस्थित प्रश्नावर भाजपाचं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:06 IST

काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी इंटरनेट डेटाच्या बाबतीत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले.

नवी दिल्ली: सध्याच्या युगात मोबाईल डेटाचा वापर खूप वाढला आहे. लोकांना आता दररोज ३ जीबीपर्यंत डेटा मिळतो. दूरसंचार कंपन्या स्वस्त प्रीपेड योजना देखील देतात. परंतु, अनेक वेळा युजर्स सोशल मीडियावर तक्रार करतात की, त्यांचा डेटा लवकर संपतो. अनेक वेळा वेळेपूर्वी डेटा संपल्याचा मेसेज येतो. सदर प्रकार काँग्रेसच्या खासदारासोबतही घडल्याचे समोर आले आहे. 

काँग्रेस खासदार जसबीर सिंग गिल यांनी इंटरनेट डेटाच्या बाबतीत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. एअरटेल आणि जिओ उघडपणे वापरकर्त्यांना लूटत आहेत. रात्री फोन बंद करून झोपला आणि सकाळी उठला तर डेटा संपतो, असा प्रकार घडत असल्याचं जसबीर सिंग गिल यांनी संसदेत सांगितलं. तसेच हीच समस्या माझ्यासह अनेक नागरिकांनाही येत असल्याची माहिती जसबीर सिंग गिल यांनी दिली. 

जसबीर सिंग गिल यांच्या या प्रश्नावर केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट उत्तर न देता तुम्ही भूतांबद्दल बोलत आहात का?, असा सवाल विचारला. तसेच हेच भूत आधी १ जीबी डेटासाठी २०० रुपये घेत होते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला. आता १ जीबी डेटासाठी २० रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागतोय. यूपीए सरकारच्या काळात बीएसएनएलचा बराच निधी वळवण्यात आला, त्यामुळे कंपनीची अवस्था वाईट असल्याचा आरोपही वैष्णव यांनी केला.

दरम्यान, इंटरनेट ही आजच्या युगातील एक मूलभूत गरज आहे. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टी आता इंटनेटवर अवलंबून असल्याने त्याशिवाय आयुष्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन मोबाईल डेटा पॅकचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे जर आपल्याला महिन्याला मिळणारा डाटा वापरण्याचे आपण नियोजन केले नाही तर आपल्याला जास्तीचा भुरदंड बसु शकतो. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारतMobileमोबाइलBJPभाजपाcongressकाँग्रेस