शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला सापडला निवडणूक विजयाचा मंत्र; भाजपाला खोचक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 11:54 IST

झारखंड, हरयाणा, महाराष्ट्रातील कामगिरीवरुन भाजपाचा समाचार

गुवाहाटी: झारखंडमधील खराब कामगिरीवरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळेच भाजपाला झारखंडमध्ये पराभव पत्कारावा लागल्याचं आझाद यांनी म्हटलं. महाराष्ट्र, हरयाणातील विधानसभा निवडणुकांमध्येदेखील भाजपाची कामगिरी ढासळली. कारण या निवडणुकांच्या आधी मोदी सरकारनं काश्मीरमधून कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, असं आझाद म्हणाले. तुम्ही जितकी वादग्रस्त विधेयक आणाल, तितक्या जास्त जागा गमवाल, अशा शब्दांत आझाद यांनी भाजपाच्या निवडणुकीतील कामगिरीवर टोलेबाजी केली. भाजपानं महाराष्ट्र, हरयाणातील निवडणुकीच्या महिनाभर आधी काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर हरयाणात त्यांना इकडून तिकडून आमदारांची जुळवाजुळव करुन सत्ता राखावी लागली. यानंतर त्यांनी देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करण्याची विधानं केली. त्यामुळे त्यांनी झारखंड गमावलं. आता दिल्लीतही ते पराभूत होतील, असं आझाद म्हणाले. ते गुवाहाटीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत नसल्याचंदेखील आझाद यांनी सांगितलं. '२०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोदींनी काळा पैसा भारतात आणण्याचं, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र काळा पैसा भारतात आलाच नाही. रोजगार देण्यात, महागाई करण्यातदेखील ते अपयशी ठरले. उलट मोदींच्या कार्यकाळात पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र कित्येक शेतकरी आत्महत्या करत आहेत,' अशा शब्दांत आझाद यांनी मोदींच्या आश्वासनांचा समाचार घेतला.  

टॅग्स :JharkhandझारखंडNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा