शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 1:03 AM

कर्नाटकात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेससह जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

नवी दिल्ली- कर्नाटकात भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानं काँग्रेससह जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तसेच भाजपाविरोधात काँग्रेस आणि जेडीएसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि जेडीएसच्या याचिकेवर तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. या पीठात न्यायाधीश ए. के. सिकरी, न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश शरद बोबडे यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 112 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. 78 जागांवर विजयी झालेल्या काँग्रेसनं काल 38 उमेदवार निवडून आलेल्या जेडीएसला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस- जेडीएस आघाडीकडे सध्या  116 आमदारांचं पाठबळ आहे. त्यामुळे आम्हाला संधी मिळावी, अशी मागणी काँग्रेस- जेडीएसनं केली आहे.LIVE अपडेट्स

येडियुरप्पांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, परंतु न्यायालयानं भाजपाला बजावली नोटीसराज्यपालांचं शपथविधीला निमंत्रण देण्याचं काम असतं. राज्यपाल आणि राष्ट्रपती कोणत्याही न्यायालयाला उत्तर देण्यास बांधील नाहीत. न्यायालय राज्यपालांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही- मुकुल रोहतगी- मुकुल रोहतगी यांचा काँग्रेसच्या याचिकांवर मध्यरात्री सुनावणी घेण्यावर आक्षेप- तासभराच्या सुनावणीनंतर अभिषेक मनु सिंघवी यांना युक्तिवाद संपवण्याची न्यायालयाची सूचना- बी. एस. येडियुरप्पांनी कुठल्या संख्याबळाच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे हे मला माहीत नाही. जोपर्यंत सत्ता स्थापनेचं पत्र मी पाहत नाही, तोपर्यंत कोणताही तर्क मी लावणार नाही, असं न्यायाधीश शरद बोबडे म्हणाले आहेत.  - येड्डियुरप्पांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला स्थगिती देण्याची सिंघवी यांची सर्वोच्च न्यायालयात मागणी- भाजपाकडे फक्त 104 आमदार आहेत. तरीही येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी निमंत्रण दिलं. हे पूर्णतः असंवैधानिक आहे- अभिषेक मनू सिंगवी

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८