शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

कर्नाटकात काँग्रेसच्या 12 आमदारांची बैठकीला दांडी, लोकसभेतही खासदारांचे वॉक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 12:49 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.

बंगळुरू - कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार पडणार की तारणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसआमदारांची बैठक सुरू असून या बैठकीला 12 आमदारांनी दांडी मारली आहे. त्यापैकी 3 आमदारांनी आजारपणाचे कारण देत बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगितले. रामलिंगा रेड्डी, डॉ. सुधाकर, रोशन बेग, तुकाराम, अंजली निंबालकर, एमटीबी नागराज, संगमेश्वरा, शिवन्ना, फातिमा, बी. नागेंद्र, राज गौड़ा, रामाप्पा अशी गैरहजर असलेल्या आमदारांची नावे आहेत. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सरकार वाचवण्यासाठी बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपाचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच. नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीला 12 आमदारांची अनुपस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार नाराज असून त्यांची मनधरणी कशी होणार हा मोठा प्रश्न आहे. तसेच, कुमारस्वामी यांचे सरकार राहणार की जाणार ? हेही लवकरच स्पष्ट होईल. मात्र, लोकसभेतही काँग्रेस खासदारांची कर्नाटकमधील राजकीय नाट्यावरुन सभागृहातून वॉक आऊट केले.

दरम्यान, आमदारांच्या राजीनामा नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण, या आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभाध्यक्ष रमेश कुमार आज निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना आमदारांचे राजीनामे घेऊ नका, असे सांगितले आहे. तसेच, सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांची आज सकाळी साडे नऊ वाजता विधानसौदामध्ये बैठक बोलविली आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसMLAआमदारKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८kumarswamyकुमारस्वामी