शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात पलायन: अल्पेश ठाकोर स्वत:च्याच जाळ्यात, काँग्रेसनेही वर केले हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 14:29 IST

द्वेष पसरवणारी भाषा वापरत असलेला अल्पेश ठाकोरांचा व्हिडीओ व्हायरल

अहमदाबाद: उत्तर भारतीयांविरोधात द्वेष पसरवण्याचा आरोप झाल्यानंतर आता काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मी जर एखाद्याला धमकी दिली असेल, तर मी स्वत: तुरुंगात जाईन, असं ठाकोर यांनी म्हटलं आहे. याशिवाय आपण 11 ऑक्टोबरपासून उपोषण करणार असल्याचंदेखील त्यांनी जाहीर केलं आहे. सध्या अल्पेश ठाकोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. यामध्ये ठाकोर यांनी द्वेष पसरवणारी भाषा वापरली आहे. त्यामुळे ते सध्या वादात सापडले आहेत. एका अल्पवयीन मुलीवर उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये घडली. यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीयांनी गुजरात सोडलं आहे. यावरुन आता अल्पेश ठाकोर वादात सापडले आहेत. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना असल्याचा आरोप होत आहे. याबद्दलचा ठाकोर यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यानंतर आता ठाकोर यांनी सारवासारव सुरू केली आहे.गुजरातमध्ये घडणाऱ्या घटनांना राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप अल्पेश ठाकूर यांनी केला आहे. लोकांना सुरक्षा पुरवण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळेच आता मला बदनाम केलं जात आहे, असा आरोप ठाकोर यांनी केला आहे. 'जर याप्रकारचं राजकारण होत असेल, तर मी राजीनामा देईन,' अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी मुलाच्या आजारपणाचा उल्लेख करत ते भावूकदेखील झाले. गुजरातमध्ये फक्त एका भागात हिंसाचार झाला आहे आणि त्याचा मी निषेध करतो, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे अल्पेश ठाकोर अडचणीत सापडल्यावर काँग्रेसनंदेखील हात वर केले आहेत. ठाकोर दोषी असतील, तर त्यांना अटक करण्यात यावी, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे. अल्पेश यांचे मित्र समजले जाणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील सावध भूमिका घेतली आहे. जर हिंसाचारमागे अल्पेश ठाकोरांचा हात असेल, तर त्यांना अटक केली जावी, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली आहे.  

टॅग्स :Alpesh Thakorअल्पेश ठाकुरGujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस