शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींच्या घरी काँग्रेसची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 17:07 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन केलं आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधी यांच्या घरी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे डी. राजा हे सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती चेमलेश्वर यांच्या घरी पोहोचले आहेत.विशेष म्हणजे राहुल गांधींच्या निवासस्थानी होणा-या बैठकीत अनेक वकीलही सहभागी होणार आहेत. त्यानंतर 6 वाजता काँग्रेस न्यायमूर्तींच्या वादावर प्रतिक्रिया देणार आहे. परंतु या बैठकीपूर्वीच माजी कायदा मंत्री आणि वरिष्ठ वकील सलमान खुर्शीद यांनी न्यायाधीशांची पत्रकार परिषद ही खूप दुःखद घटना असल्याचं सांगितलं आहे.देशातील सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्वतःची बाजू मांडावी लागत आहे, यासारखे दुर्दैव ते काय, अशी प्रतिक्रिया सलमान खुर्शीद यांनी दिली आहे. तर ज्येष्ठ वकील आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, न्यायाधीशांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच पत्रकार परिषद घेणारे ते चार न्यायाधीश प्रामाणिक आहेत. त्यांच्या उद्देशावर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही सुब्रमण्यम स्वामींनी केली आहे.न्यायव्यवस्थेत केंद्र सरकारचा हस्तक्षेप घातक- ममतापश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वादावर भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाती चार न्यायाधीशांकडून मिळालेल्या माहितीमुळे देशातील एक नागरिक म्हणून मी अस्वस्थ झाले आहे. न्यायव्यवस्था आणि मीडिया हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. न्यायव्यवस्थेत केंद्र सरकारचा हस्तक्षेप घातक आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. परंतु केंद्र सरकारकडून अद्यापही या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ममता बॅनर्जी आणि वकिलांना सोडल्यास काँग्रेस किंवा भाजपाकडून अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस