शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:23 IST

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षातील नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Congress Meeting:लोकसभा निवडणुकीची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधीमंडळ पक्ष (CLP) नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि आगामी भारत न्याय यात्रेबाबत चर्चा करणे, हा या बैठकीचा अजेंडा होता. यादरम्यान खरगेंनी भाजपवर जोरदार टीका केली. 

पक्षश्रेष्ठींच्या बैठकीला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पुढील तीन महिने पक्षासाठी झोकून द्या. आपापसातले मतभेद विसरा, मीडियामध्ये पक्षांतर्गत मुद्दे उपस्थित करू नका. पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी सोबत काम करता. एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांवर विशेष लक्ष द्या," अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

भाजपवर टीकास्र"गेल्या 10 वर्षातील आपल्या सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजप भावनिक मुद्दे पुढे करत आहे. प्रत्येक मुद्द्यावर ते काँग्रेसला गोवतात. जनतेसमोर तळागाळातील प्रश्नांवर भाजपच्या खोटेपणा, फसवेगिरी आणि चुकीच्या कृत्यांना आपण संघटित होऊन चोख प्रत्युत्तर द्यायचे आहे." खरगे यांनी यावेळी दावा केला की, "ज्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्ष आहे, तिथे भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) केवळ नावापुरतीच राहिली आहे."

खरगे पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मणिपूरमधील अनुपस्थिती, हे राष्ट्रीय प्रश्नांवर किती बेजबाबदार आहेत हे दिसून येते. आधुनिक भारताच्या उभारणीत काँग्रेसच्या योगदानाकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतात. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. पीएसयू आणि मोठ्या संस्था विकल्या जाताहेत, रेल्वे विकली जातीय, प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

 

 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाBJPभाजपाElectionनिवडणूक