शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल जनभावनांचे प्रतिबिंब- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:40 IST

मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.

मुंबई : काँग्रेस पक्ष हा ‘मन की बात’ नव्हे, तर ‘जन की बात’ करणारा पक्ष आहे. त्यामुळेच लोकांमध्ये जाऊन आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा तयार करीत आहोत. मुंबईतील सर्व स्तरातील लोकांनी दोन तासांच्या भेटीत तब्बल ६७ सूचना जाहीरनामा समितीला दिल्या असून, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याचे निश्चित प्रतिबिंब उमटेल, असे प्रतिपादन काँग्रेस जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केले.मुंबईकरांसाठी महागाई, रोजगार आणि संरक्षण हे महत्त्वाचे मुद्दे असून, तेच मोदी पर्वाचा शेवट करतील, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. मुंबई काँग्रेसने जाहीरनाम्यासंदर्भात वांद्रे (प.) येथील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये परिसंवाद आयोजित केला होता. मुंबई काँगेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार कुमार केतकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते. परिसंवादात ज्येष्ठ नागरिक, महिला, उद्योजक, डॉक्टर, वकील, विचारवंत, व्यावसायिक, व्यापारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.चिदंबरम म्हणाले, भाजपा सरकार हे अहंकारी सरकार आहे. लोकशाहीला न मानणाऱ्या पक्षाचे हे सरकार जुमलेबाज सरकार आहे. म्हणूनच ए.सी. केबिनमध्ये बसून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशा घोषणा भाजपाने केल्या. काँग्रेस अशी खोटी आश्वासने देणार नाही.जनतेत जाऊन त्यांच्या मागण्या, अडचणी आम्ही समजून घेऊ. त्यावरील उपायांची चर्चा करून त्यांचा आमच्या जाहीरनाम्यात समावेश करू. त्यासाठीच या परिसंवादाचे आयोजन केले आहे. मुंबईकरांचे म्हणणे ऐकण्यासाठीच आम्ही आलो आहोत. तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता. उपाय व सूचना सुचवू शकता. अडचणी सांगू शकता, असे चिदंबरम म्हणाले.जाहीरमान्यात समस्यांचा विचार करूमुंबईतील पायाभूत सुविधा, पाणी समस्या, बेरोजगारी, महागाई, इंधनाचे वाढते दर, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, महिला संरक्षण, महिला प्रवाशांच्या समस्या, खासगीकरण, लघू व मध्यम उद्योगांच्या समस्या, जीएसटी, नोटाबंदीचे परिणाम, कोलमडलेली अर्थव्यवस्था अशा विविध समस्या व अडचणी उपस्थितांनी मांडल्या. या सर्व मागण्या ऐकल्यानंतर महागाई, रोजगार आणि संरक्षण या मुंबईकरांच्या प्रमुख समस्या असल्याचा निष्कर्ष चिदंबरम यांनी काढला. या तिन्ही समस्यांचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सर्वांगीण विचार केला जाईल, अशी ग्वाही चिदंबरम यांनी या वेळी दिली.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९