भाजप सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: August 7, 2015 01:12 IST2015-08-07T01:12:28+5:302015-08-07T01:12:28+5:30
भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना...

भाजप सरकारविरोधात काँग्रेसची निदर्शने
घोटाळेबाज मंत्री हटवा : २५ खासदारांचे निलंबन रद्द करा
गडचिरोली : भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे गुरूवारी दुपारी गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली. ३ आॅगस्ट रोजी लोकसभेत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी पाच दिवसांकरिता निलंबित केले. ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केला. काँग्रेस खासदारांचे निलंबन रद्द करा, संपूर्ण कर्जमुक्ती करा, शेतमालाला योग्य भाव द्या अशा मागण्या करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवाय ‘वारे मोदी तेरा खेल-सस्ती दारु महंगा तेल’, ‘लोकशाहीची हत्या करणाऱ्या बीजेपी सरकारचा निषेध असो’ अशा आक्रमक घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.
या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सचिव हसनअली गिलानी, प्रदेश काँग्रेसचे सदस्य रवींद्र दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष पी. आर. आकरे, सेवादल अध्यक्ष राजू गारोदे, युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव संतोष आत्राम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, डी. डी. सोनटक्के, महेंद्र ब्राम्हणवाडे, नंदू वाईलकर, पंडितराव पुडके, प्रभाकरराव वासेकर, सी. बी. आवळे, नरेंद्र भरडकर, सतिश विधाते, पांडुरंग घोटेकर, रजनिकांत मोटघरे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जीवन कुत्तरमारे, पुरूषोत्तम मेश्राम, देवेंद्र भांडेकर, शेखर आखाडे, आकाश बगेल, सुमित बारई, जगदिश पडियाल, गंगाधर म्हस्के, महादेव भोयर, डी. एम. वेलादी यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)