शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:37 IST

भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे. 

भोपाळ - कर्नाटक आणि गोव्यानंतर भाजपाच्या निशाण्यावर मध्य प्रदेश सरकार आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. भाजपा नेत्यांकडून तसे संकेत मिळत असले तरी काँग्रेसकडून विरोधी पक्ष स्वप्न बघत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र खबरदारी म्हणून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी एका मंत्र्याला 4 आमदारांना सांभळण्याची जबाबदारी दिली आहे. सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गोवा आणि कर्नाटकमधून उठलेलं वादळ मध्य प्रदेशच्या दिशेने वाहत असून काही दिवसांत वातावरण ठिक होईल असा व्हॉट्सअप मॅसेज आल्याचं सांगत संकेत दिले आहेत. 

तर मध्य प्रदेशमधील अन्न पुरवठा मंत्री प्रद्युम सिंह तोमर यांनी सरकारवर कोणतंही संकट नसल्याचा दावा केला आहे. सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं आरोग्य मंत्री तुलसी सिलावट यांनी सांगितले आहे. तर भाजपा गेल्या 7 महिन्यांपासून स्वप्न बघत आहे. जे अद्याप साकार झालं नाही असा टोला मंत्री प्रदीप जयस्वाल यांनी भाजपाला लगावला आहे. 2018 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश निवडणुकीत भाजपाला 109 जागा तर काँग्रेसला 114 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपातील एका आमदाराला खासदारकीची संधी मिळाल्यामुळे भाजपाची संख्या 108 झाली आहे. सरकार स्थापनेसाठी 116 आमदारांची गरज आहे.

काँग्रेस सरकारला 1 समाजवादी पक्ष, 2 बसपा आणि 4 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून सत्ता स्थापनेची स्वप्न पाहिली जात आहे असा दावा काँग्रेसने केला. तर ज्या बसपा आमदाराने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे तो आमदार सध्या नाराज आहे. शुक्रवारी विधानसभेत बसपा आमदार रामबाई यांनी त्यांच्या कुटुंबाला एक प्रकरणात गोवलं जात आहे असा आरोप केला. तसेच जर त्यांना न्याय मिळत नसेल तर राज्यात कोणाला न्याय मिळणार अशी नाराजी बसपा आमदाराने बोलून दाखविली त्यामुळे भाजपा नेते आनंदी आहेत. त्यामुळे आगामी काळात गोवा, कर्नाटकसारखं मध्य प्रदेशातही राजकीय संकट उभं राहील का यावर प्रश्नचिन्ह आहे.   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस