केरळमधील राजकीय समीकरणांसंदर्भात एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार, जर आज केरळमध्ये लोकसभेसाठी निवडणुका झाल्या, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (UDF) पुन्हा एकदा सर्वात शक्तीशाली ठरेल, असा अंदाज 'इंडिया टुडे' आणि 'सी-वोटर'च्या 'मूड ऑफ द नेशन' (MOTN) सर्व्हेने व्यक्त केला आहे.
या सर्व्हेनुसार, केरळमधील एकूण २० लोकसभा जागांपैकी १८ ठिकाणी यूडीएफ भक्कम स्थितीत आहे. ऑगस्ट २०२५ च्या सर्वेक्षणातही यूडीएफ याच स्थितीत होते. महत्वाचे म्हणजे, सत्ताधारी डाव्या आघाडीला (LDF) सर्वात मोठा धक्का बसताना दिसत आहे. एलडीएफच्या पारड्यात एकही जागा जाणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपने गेल्या निवडणुकीत खाते उघडल्यानंतर आता त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
व्होट शेअरही बदलणार - महत्वाचे म्हणजे, २०२४ च्या तुलनेत यूडीएफच्या मतांच्या टक्केवारीत ३ टक्क्यांची घट होणे अपेक्षित आहे. मात्र असे असले तरी, भाजपच्या मतांचा टक्का १७ टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर, यूडीएफची सरशी दिसत असली, तरी विधानसभा निवडणुकांसंदर्भात चित्र अनिश्चित आहे. कारण, गेल्या दोन वेळा, केरळमधील मतदार लोकसभेसाठी यूडीएफ आणि विधानसभेसाठी एलडीएफची निवड करत आले आहेत.
२०२६ मध्ये तब्बल पाच राज्यांत विधानसभा निवडणुका -देशात २०२६ मध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. यांत केरळसह पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. येथे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळवले आहे. तर डाव्यांचा पराभव झाला. तसेच, भाजपचा विचार करता, भाजपने तिरुवनंतपुरम महापालिकेत सत्ता काबीज करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Web Summary : If elections were held today, UDF would win 18 of 20 Kerala Lok Sabha seats. LDF faces setbacks. BJP's vote share is expected to rise significantly, from 17% to 25%.
Web Summary : आज चुनाव होने पर यूडीएफ को केरल की 20 में से 18 लोकसभा सीटें मिलेंगी। एलडीएफ को नुकसान। भाजपा का वोट शेयर 17% से बढ़कर 25% होने की उम्मीद है।