शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
4
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
5
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
6
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
7
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
8
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
9
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
10
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
11
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
12
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
13
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
14
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
15
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
16
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
17
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
18
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
19
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
20
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:04 IST

या निवडणुका महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या लोकप्रतिनिधी निवडीसाठी घेण्यात आल्या आहेत.

तिरुवनंतपुरम - केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. याठिकाणी एकूण १२०० स्थानिक संस्थांपैकी ११९९ महापालिका, नगरपालिकांसाठी ९ आणि ११ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. कन्नूर जिल्ह्यातील मत्तानूर नगरपालिकेत यावेळी निवडणुका झाल्या नाहीत कारण सप्टेंबर २०२७ मध्ये तेथे निवडणुका होणार आहेत. केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ७०.९१ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ७६.०८ टक्के मतदान झाले. या निवडणुका महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या लोकप्रतिनिधी निवडीसाठी घेण्यात आल्या आहेत.

तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलम या सात जिल्ह्यांमधील पंचायत, नगरपालिका आणि तीन महानगरपालिकांमधील ११,००० हून अधिक वॉर्डसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुका ९ डिसेंबर रोजी पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यानंतर दोन दिवसांनी ११ डिसेंबर रोजी सात जिल्ह्यांमधील ५९५ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पार पडला. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल अनेकदा मतदारांच्या मूडचे संकेत देतात. २०१० आणि २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी युतीच्या विरोधात गेल्या. त्यानंतर २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी विजय मिळवला होता. 

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) सहापैकी तीन महानगरपालिकांमध्ये  आघाडीवर आहे. कोची, त्रिशूर आणि कन्नूरमध्ये UDF आघाडीवर आहे. कोल्लम आणि कोझिकोडमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी (LDF) आघाडीवर आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत NDA आणि LDF यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कन्नूर महापालिकेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ १२ प्रभागांमध्ये, सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील LDF ६ प्रभागांमध्ये आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए २ प्रभागांमध्ये आघाडीवर आहे. कोची महानगरपालिकेत चुरशीची लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एलडीएफ विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु यूडीएफने जोरदार कमबॅक केले आहे. सध्या दोन्ही आघाड्या ३२-३२ जागांवर बरोबरीत आहेत तर भाजपा पाच प्रभागांमध्ये आघाडीवर आहे.

तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीएने २१ वॉर्डमध्ये आघाडी घेतली आहे तर एलडीएफ १६ वॉर्डमध्ये आणि यूडीएफ ११ वॉर्डमध्ये आघाडीवर आहे. कर्नाटकातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी ९:३० पर्यंतच्या कलांवरून याठिकाणी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. परंतु कोणत्याही महानगरपालिकेत ते आघाडीवर नाहीत. एका नगरपालिकेत त्यांची आघाडी आहे तर १९ ग्रामपंचायत जागांवर भाजपाची आघाडी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kerala Local Body Polls: Congress Leads; Tight Race in Thiruvananthapuram

Web Summary : Kerala local body election results show Congress leading in three corporations. Thiruvananthapuram sees a tight contest between NDA and LDF. Early trends suggest a close fight in Kochi as well. Results crucial before 2026 assembly polls.
टॅग्स :Electionनिवडणूक 2025KeralaकेरळBJPभाजपाcongressकाँग्रेस