शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 21:20 IST

मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही.

नवी दिल्ली -  मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही. दरम्यान, महायुतीतील मतभेदांमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सध्याची परिस्थिती तसेच विधानसभा निकालांसंदर्भात माहिती दिली. सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की,''आज झालेल्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील निकाला संदर्भात माहिती सोनिया गांधी यांना दिली. निवडून आलेल्या जागा, मतविभाणी आणि गमावलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाली. तसेच सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थितीची कल्पनाही सोनिया गांधी यांना दिली.''  मात्र या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली का याबाबत सांगणे मात्र थोरात यांनी टाळले. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भजापा आणि शिवसेनेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यातच राज्यात भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधीसुद्धा फारशा अनुकूल नाहीत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी