विरोधक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून निलंबन; ही लोकशाहीची हत्या : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 06:14 IST2021-12-15T06:14:05+5:302021-12-15T06:14:47+5:30
Rahul Gandhi On Pm Narendra Modi : राहुल गांधी यांनी मोदींच्या गैरहजेरीवर केला सवाल

विरोधक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून निलंबन; ही लोकशाहीची हत्या : राहुल गांधी
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : विविध पक्षांच्या संसद सदस्यांचे निलंबन होऊन १४ दिवस झाले आहेत. सभागृहात ज्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करु इच्छितो, ती चर्चा सरकार होऊ देत नाही. विरोधक आपला आवाज उठविण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा धमकावून त्यांना निलंबित केले जाते. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दात संपूर्ण विराेधकांना सोबत घेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.
राजकारणाचा धर्म पाळा
राहुल गांधी यांनी गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, त्यांनी आपली जीप शेतकऱ्यांच्या अंगावर घातली. यामागे कोणती शक्ती आहे, त्यांना कोणत्या शक्तीने ही सूट दिली, इतक्या दिवसांनंतरही कोणत्या शक्तीने त्यांना आजपर्यंत तुरुंगाबाहेर ठेवले आहे. मोदी यांचे नाव न घेता त्यांनी ट्विट केले की, धर्माचे राजकारण करतात. आज राजकारणाचा धर्म पाळा.