शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

National Herald Case : सोनिया गांधींवरील ED च्या कारवाईविरोधात राहुल गांधी रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 13:38 IST

या मुद्द्यावर एकीकडे, काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात सरकारला घेरले, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहे. 

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेसच्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी मंगळवारी पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. यानंतर, ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने गल्लीपासून ते संसदेपर्यंत जबरदस्त विरोध केला. या मुद्द्यावर एकीकडे, काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात सरकारला घेरले, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला विंगने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयावर केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मार्च काढला. यानंतर, राहुल गांधींनी खासदारांसह विजय चौकात धरणे आंदोलन केले. यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर काही खासदारांना ताब्यात घेतले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी? -पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचे सर्व खासदार येथे बेरोजगारी आणि महागाईसंदर्भात बोलण्यासाटी आले होते. मात्र, पोलीस येथे बसू देत नाहीत. संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. येथे आम्हाला अटक केली जात आहे.

तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला राजघाटावर निदर्शन करण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. येथे कलम 144 लागू करण्यात आले होते. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय