शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

काँग्रेस नेते सिद्धारामय्यांचे महिलेशी गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 5:01 PM

काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता एका कार्यक्रमामध्ये तक्रारी ऐकत असताना संतापलेल्या सिद्धारामय्या यांनी तक्रार करत असलेल्या महिलेवर खेकसून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल हा प्रकार म्हैसूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडला

बंगळुरू - काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये तक्रारी ऐकत असताना संतापलेल्या सिद्धारामय्या यांनी तक्रार करत असलेल्या महिलेवर खेकसून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. हा प्रकार म्हैसूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडला असून, तिथे उपस्थित असलेल्या सिद्घारामय्यांकडे एक महिला तक्रार मांडत होती. मात्र सिद्धारामय्या यांनी दिलेल्या उत्तरावर त्या महिलेचे समाधान होत नव्हते. त्यामुळे तिने सिद्धारामय्यांसोबत वाद घातला. या प्रकारामुळे संतापलेले सिद्धारामय्या त्या महिलेला वारंवार शांत राहण्यास सुनावले. मात्र सदर महिला ऐकून घेण्यास तयार नव्हती. त्यावेळी त्या महिलेला शांत करण्याच्या नादात सिद्धारामय्या यांच्याकडून तिची ओढणी खेचली गेली. 

दरम्यान, या प्रकारावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव म्हणाले की, कधीकधी लोक टोकाचे प्रश्न विचारतात. त्यांचे म्हणणे  ऐकून घेतल्यानंतरही ते शांत राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हातातील माईक खेचण्याचा प्रयत्न करता. माईक खेचतानाच सदर महिलेची ओढणी खेचली गेली. त्या महिलेशी गैरवर्तन करण्याचा सिद्धारामय्या यांचा हेतू नव्हता. 

दरम्यान, या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सिद्धारामय्या यांनी ज्या प्रकारे संबंधित महिलेशी गैरवर्तन केले. त्यावरून त्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसून आला. हा गुन्हा आहे. आता सिद्धारामय्या यांच्यावर काय कारवाई करणार याचे उत्तर रहुल गांधी यांनी द्यावे, असे भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, संबंधित महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत झाल्या प्रकाराबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सिद्धारामय्या हे राज्याचे चांगले मुख्यमंत्री होते, असेही या महिलेने सांगितले. 

तसेच सिद्धारामय्या यांनीही त्या महिलेशी गैरवर्तन करण्याचा आपला हेतू नव्हता. त्या महिलेला बोलण्यापासून रोखत असताना अनावधानाने तो प्रसंग घडला. सदर महिलेला मी 15 वर्षांपासून ओळखतो. तसेच ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे, असे सिद्धारामय्या यांनी सांगितले. 

 

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण