शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

"राजकारण नको पण अशा स्थितीत त्यांनी मणिपूरला...", भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून राहुल गांधींचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 14:41 IST

manipur violence latest news : दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळले मणिपूर आताच्या घडीला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.

नवी दिल्ली : मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसाचाराची आग आहे. अनेक निष्पाप नागरिक यात मृत्यूमुखी पडले. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आज राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण शुक्रवारी अनेक नाट्यमय घडामोडींनतर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधक सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱ्यावरून जाऊन पीडितांची भेट घेतली. 

दरम्यान, राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावरून देखील राजकारण चांगलेच तापले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर काहीच का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. तर राहुल गांधींचा दौरा म्हणजे केवळ ड्रामा असल्याचे प्रत्युत्तर भाजपाने दिले. पण मणिपूर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा ए शारदा देवी यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून गांधींचे कौतुक एएनआयने या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शारदा देवी यांनी म्हटले, "सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधी यांनी मणिपूरला दिलेली भेट याचे कौतुक वाटते. तसेच ही परिस्थिती सोडवणे आणि शांतता प्रस्थापित करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या मुद्द्याचे राजकारण कोणीही करू नये." 

"जनतेचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास""परिस्थिती सुधारेल असा विश्वास असल्याने जनता मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत बाहेर आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात न आल्यास हाताबाहेर जाऊ शकते, असा लोकांचा विश्वास आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही मागील सरकारच्या कारभारामुळे ओढवली आहे. मुख्यमंत्री बीरेन यांच्या सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे", असेही प्रदेशाध्यक्षा ए शारदा देवी यांनी म्हटले. 

खरं तर मागील रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी शनिवारीच गृहमंत्री शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत १८ पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती. 

कार्यकर्त्यांचा हंगामा अन् अखेर खुलासाशुक्रवारी मुख्यमंत्री बिरेन सिंह पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. अशातच काही महिला समर्थकांनी राजभवनासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे जाऊ दिला नाही. यादरम्यान काही महिला आंदोलकांनी मुख्यमंत्र्याचे राजीनामा पत्र फाडले आणि त्यांच्या राजीनाम्यास विरोध दर्शवला. मोठ्या गदारोळानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सिंह यांनी जाहीर केले. 

 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा