"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 20:05 IST2021-08-09T20:05:02+5:302021-08-09T20:05:32+5:30
पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे.

"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी, क्रीडा बजेटमधील कपात आणि ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना बक्षिसांच्या रक्कमेसंदर्भात भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंना फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता त्यांना पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. (Congress Leader Rahul Gandhi target PM Narendra Modi said call to players have done now reward shoul)
राहुल गांधी यांनी इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘‘खेळाडूंना अभिनंदनाबरोबरच त्यांचा अधिकारही मिळायला हवा, क्रीडा बजेटमध्ये कपान नव्हे. फोन कॉलचा व्हिडिओ पुष्कळ झाला, आता बक्षिसाची रक्कमही द्या!" याच बरोबर राहुल गांधी यांनी काही बातम्यांचे स्क्रीन शॉटही शेअर केले आहेत. यात म्हणण्यात आले आहे, की हरियाणात पूर्वी अनेक ऑलिम्पिक विजेत्यांना बक्षिसांची घोषणा करण्यात आली, मात्र, त्यांना ते देण्यात आले नाही.
ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा
BCCI देखील देणार खेळाडूंना बक्षीस
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसाठी रोख बक्षीस रक्कमेची घोषणा केली. बीसीसीआय सुवर्णपदक विजेत्या नीरजला 1 कोटी, रौप्यपदक विजेत्या मीराबाई व रवी दहिया यांना प्रत्येकी 50 लाख, कांस्यपदक विजेते पी व्ही सिंधू, लवलिना बोरगोईन आणि बजरंग पुनिया यांना प्रत्येकी 25 लाख व भारतीय पुरूष हॉकी संघाला 1.25 कोटी रुपये देणार आहे.