शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 11:31 IST

Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्यासध्या देशात ३४,४७,१३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात दररोज साडेतीन लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण पडताना दिसत आहे. गेल्यावर्षी सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी टीका केली होती. परंतु आता कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच हे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. "भारत सरकारला समजत नाहीये. या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमात्र मार्ग आहे आणि तो म्हणजे संपूर्ण लॉकडाऊन. भारत सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जात आहे," असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला.  गेल्या चोवीस तासांत देशात ३, ५७,२२९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ३,२०,२८९ जणांनी कोरोनावर मात केली. देशात गेल्या चोवीस तासांत ३,४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात ३४,४७,१३३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिली. तसंच आतापर्यंत देशात १५,८९,३२,९२१ नागरिकांचं लसीकरण झालं असल्याचंही सांगण्यात आलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतTwitterट्विटर