बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 06:22 PM2020-07-20T18:22:50+5:302020-07-20T18:50:24+5:30

राहुल यांच्या १० आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट व्हायरल; सोशल मीडियावर लूकची चर्चा

congress leader rahul gandhi new look viral on social media | बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

googlenewsNext

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. कोरोना संकटाची हाताळणी आणि लॉकडाऊनचा गरिबांना बसलेला फटका या मुद्द्यांवर राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत आहेत. या व्हिडीओतील राहुल गांधी यांच्या लूकची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामधील राहुल यांचा लूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओत राहुल यांचे केस काहीसे कुरळे दिसत होते. त्यांनी हाफ टीशर्ट परिधान केला होता.





राहुल यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर जोरदार टीका केली. या व्हिडीओत त्यांचे केस काहीसे मोठे आणि कुरळे दिसत आहेत. याशिवाय थोडी दाढीदेखील दिसत आहे. मात्र आठवड्यापूर्वीच्या व्हिडीओत राहुल यांचे केस अतिशय लहान दिसत होते. राहुल यांनी क्लिश शेव्ह केली होती. 





राहुल यांच्या दोन लूकची तुलना करून अनेक जण सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत. अवघ्या सात दिवसांत राहुल यांचा लूक इतका कसा बदलला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण हा राहुल यांचा जुना लूक असून व्हिडीओ आधी चित्रित झाल्याचा दावा केला आहे. राहुल यांच्या १० जुलै आणि १७ जुलैच्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असून अवघ्या आठवड्याभरात लूक इतका कसा काय बदलू शकतो, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Web Title: congress leader rahul gandhi new look viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.