शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

वंश-धर्माच्या आधारावर फूट पाडणारे स्वतःला राष्ट्रवादी म्हणताहेत; राहुल गांधींचा ट्रम्प-मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:41 AM

भारत व अमेरिकेला मानवीय स्वतंत्रता, लोकशाही व लोकशासन वाढवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेत पूर्वीसारखी सहिष्णुता राहिली नाही. दोन्ही देशांत वंश व धर्माच्या आधारावर फूट पाडणारे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या चर्चेत ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटानंतर आता नवे विचार पुढे येताना दिसत आहेत. निकोलस बर्न्स यांनी चीनच्या नेतृत्वाला भयभीत व आपल्याच लोकांवर पकड ठेवणारे, म्हटले आहे. भारतअमेरिका चीनसाठी लढण्यासाठी नव्हे, तर त्याच्याशी कायद्याच्या शासनाचे पालन करण्यासाठी एकत्र काम करू शकतात, असेही ते म्हणाले. चीनशी कसलाही संघर्ष नाही. ही विचारांची लढाई आहे. भारत व अमेरिकेला मानवीय स्वतंत्रता, लोकशाही व लोकशासन वाढवण्यासाठी एकत्रित काम केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाबाबत ते म्हणाले की, आम्ही सहिष्णू आहोत म्हणून एकसारखे वाटतो. आमचा डीएनए सहनशील मानला जातो. आम्ही नव्या विचारांना स्वीकारतो. आम्ही खुल्या विचारांचे आहोत; परंतु आता ते गायब होत आहे. मात्र, मी आशावादी आहे. कारण देशाच्या डीएनएला मी जाणतो. कोरोनाच्या संकटाने आम्हाला बरेच काही शिकवले आहे. भारत-अमेरिकेत पूर्वी समझोत्याचे संबंध होते; परंतु आता ते देण्या-घेण्याचे झाले आहेत. यावेळी बर्न्स म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे जगातील शक्ती संतुलनात व्यापक बदल शक्य दिसत नाहीत.

दोन्ही देशांतील सत्तारूढ पक्षांवर निशाणा

राहुल गांधी यांनी यावेळी दोन्ही देशांतील सत्तारूढ पक्षांवर निशाणा साधताना म्हटले आहे की, जेव्हा अमेरिकेमध्ये आफ्रिकी-अमेरिकी, मेक्सिकन व इतर लोकांमध्ये फूट पाडली जाते. तशीच भारतात हिंदू, मुस्लिम व शिखांमध्ये फूट पाडली जाते. असे करताना देशाचा पाया खिळखिळा होतो; परंतु असे करणारेच स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय! 'ही' दोन लक्षणं असल्यास वेळीच व्हा सावध; नाहीतर...

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

CoronaVirus News : काय सांगता? PPE किट घालून कोरोनाग्रस्त आरोपीने रुग्णालयातून काढला पळ

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmericaअमेरिकाIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा