शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दबावाखाली विरोधकांचा आवाज दाबणार नाही...; ट्विटर डिलवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 10:35 IST

इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला.आता ट्विट मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. 

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला. यासाठी त्यांनी टेस्लाचे काही शेअर्स १५.५ अब्ज डॉलर्सला विकले तर १३ अब्ज डॉलर्सचे कर्जही काढले. आता ट्विट मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. या करारानंतर, ट्विटर देशातील नवीन आयटी नियमांचे पालन करेल अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही ट्विटर आता द्वेषयुक्त भाषणांवर कारवाई करेल, अशी आशा व्यक्त केली. 

ट्विटर डीलनंतर राहुल गांधी यांनी इलॉन मस्क यांचे अभिनंदन केले. "अभिनंदन इलॉन मस्क. मला आशा आहे की ट्विटर आता द्वेषयुक्त भाषणावर कारवाई करेल. वस्तुस्थिती अधिक कठोरपणे तपासली जाईल. आता सरकारच्या दबावामुळे भारतातील विरोधकांचा आवाज दाबून चालणार नाही. यासोबतच राहुल गांधींनी त्यांच्या फॉलोअर्सच्या वाढीचा आलेखही शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेचा फोटो शेअर केल्यानंतर आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून नोटीस मिळाल्यानंतर त्यांचे ट्विटर हँडल तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी काही काळ ट्विटर वापरू शकले नाहीत.

ट्विटरसाठी अब्जाधीश मस्कने शेअर्स विकले, कर्जही काढले; पहिल्याच दिवशी सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

यासोबतच राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलचा आलेखही शेअर केला आहे. राहुल गांधींनी शेअर केलेल्या ग्राफमध्ये जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत होती. ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यांच्या फॉलॉअर्सची वाढ थांबली होती. यावर राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, ट्विटरने त्यांच्या अकाऊंटशी छेडछाड केली आहे. मात्र, फेब्रुवारी २०२२ नंतर त्यांचे फॉलोअर्स पुन्हा वाढू लागले.

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने गुरुवारी ट्विटर खरेदीचा करार पूर्ण केला, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले असून, चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकत मस्क यांनी ट्विटरची साफसफाई सुरू केल्याचे त्यात म्हटले. अग्रवाल, गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल व सल्लागार सीन एजेट यांचा समावेश यांच्यावर तूर्तास मस्क यांची कुऱ्हाड कोसळली.

नेटकरीही दुभंगलेले मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार बंद केल्याने आणि सोशल मीडिया फर्मच्या चार उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकल्याने, भारतात ट्विटरवर भारतीय वापरकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ट्विटरवरील मजकूर नियंत्रित करण्यास विरोध करणारे मस्क यांच्या आगमनाचे स्वागत करीत आहेत, तर उर्वरित सावध प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTwitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क