देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. अशातच बरोजगारीचंही संकट देशासमोर उभं राहिलं आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात रोजगारात ०.९ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे तब्बल ३५ लाख नोकऱ्यांवर संकट उभं राहिलं. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्टोबर महिन्यातही रोजगारात ०.१ टक्क्यांची घट झाली होती."युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार," असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 16:09 IST
rahul gandhi : युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार म्हणत राहुल गांधींची सरकारवर टीका
शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाचा आज ३४ वा दिवसनोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीच्या प्रमाणातही वाढ