गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरीही गाठली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर असतील किंवा कोरोनाची परिस्थिती असेल यावरून सातत्यानं विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेदेखील सातत्यानं टीका करत आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींवरून त्यांनी 'महागाईचा विकास' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर जोरदार टीका केली. "अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होत आहे. पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे करण्यात आलेला महागाईतील विकास दिसेल. कर वसुली, महागाईच्या लाटा सातत्यानं येत जात आहेत," असं राहुल गांधी म्हणाले.
इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका; म्हणाले, "पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:29 IST
Petrol Diesel Price Hike : गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलनं पार केली शंभरी.
इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका; म्हणाले, पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे...
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत.अनेक ठिकाणी पेट्रोलनं पार केली शंभरी.