शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'कुत्र्यांनी भाजपवाल्यांचे काय बिघडवले...?', बिस्किट खाऊ घालण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी स्पष्टच बोलले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 18:03 IST

काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, कारच्या छतावर बसून एका कुत्र्याला बिस्किट देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे...

काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान, कारच्या छतावर बसून एका कुत्र्याला बिस्किट देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, कुत्रा बिस्कीट खात नाही, तेव्हा राहुल गांधी तेथेच उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्याला ते बिस्किट देतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आता यासंदर्भात राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी एका पत्रकार परिषदेत म्हणाले, "यात एवढं मोठं काय? जेव्हा त्या कुत्र्याला माझ्याकडे आणले तेव्हा तो पूर्णपणे भांबावलेला होता. तो थरथरत होता. मी त्याला बिस्कीट खायला दिले, त्याने खाल्ले नाही. म्हणून मी ते बिस्कीट त्या व्यक्तीला दिले. आणि भाऊ तुम्हीच खाऊ घाला असे म्हणालो. यानंतर, कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले. यावर भाजपच्या लोकांना काय ऑब्जेक्शन आहे? कुत्र्यांनी त्यांचे काय बिघडवले आहे."  

पल्लवी नावाच्या एका महिलेनेही सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ शअर केला आहे. यात त्यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना टॅग करत, "हिमंता यांच्यानंतर, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या आणखी एका सपोर्टरला डॉगीच्या प्लेटमधील बिस्किट दिले," असे लिहिले. याला उत्तर देत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लिहिले आहे, "पल्लवी जी, राहुल गांधीच नाही, तर संपूर्ण कुटुंबही मला ते बिस्किट खाऊ घालू शकलं नही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्किट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामा दिला."

काय होतं संपूर्ण प्रकरण - भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, 'काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्ष खर्गे जी यांनी पक्षाच्या बूथ एजंटची तुलना कुत्र्यासोबत केली होती आणि इकडे राहुल गांधी त्यांच्या दौऱ्यात एका कुत्र्याला बिस्किट देत आहेत. मात्र कुत्र्याने ते बिस्किट खाल्ले नाही, यानंतर त्यांनी तेच बिस्किट त्यांच्या एका कार्यकर्त्याला दिली.'

एवढेच नाही तर, "ज्या पक्षाचा अध्यक्ष आणि युवराज आपल्या कार्यकर्त्यांसोबत कुत्र्यासारखा व्यवहार करत असतील तर, असा पक्ष लुप्त होणे स्वाभाविक आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdogकुत्राcongressकाँग्रेसBJPभाजपा