शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२०१४ नंतर देशात 'असा' वाढला ड्रॅगन; राहुल गांधींकडून आकडेवारी शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:22 IST

मेक इंडिया म्हणायचं अन् चीनमधून विकत घ्यायचं; राहुल गांधींचा आकडेवारीसह हल्ला

नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमावाद वाढत असताना, दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकारनं ५९ चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घातली. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर आकडेवारीसह निशाणा साधला आहे. २०१४ पासून देशात ड्रॅगन कसा वाढला, याची माहिती राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.  मोदी सरकारनं काल चिनी अ‍ॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना राहुल यांनी गेल्या सहा वर्षांत चीनमधून होणारी आयात कशी वाढली, याची आकडेवारी ट्विट केली. 'आकडे खोटं बोलत नाहीत. भाजप म्हणतो मेक इन इंडिया. पण असं म्हणून ते चीनकडून खरेदी करतात,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चीनकडून होणारी आयात यांची तुलना राहुल यांनी केली आहे. २००८ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत चीनकडून होणाऱ्या आयातीचं प्रमाण १४ टक्के होतं. तेच प्रमाण भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात १८ टक्क्यांवर गेलं. २००८ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चीनमधून होणारी आयात १२ टक्के होती. २०१२ मध्ये ती १४ टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर २०१४ नंतर हेच प्रमाण १३ टक्क्यांवर आलं, अशी आकडेवारी राहुल यांनी दिली आहे.'मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार येताच २०१५ मध्ये चीनमधून होणारी आयात १४ टक्क्यांवर गेली. आयातीचं प्रमाण २०१६ मध्ये १६ टक्के, २०१७ मध्ये १७ टक्के आणि २०१८ मध्ये १८ टक्क्यांपर्यंत गेलं,' अशी माहिती राहुल यांनी दिली आहे. राहुल यांनी केलेलं ट्विट काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी रिट्विट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्यानं योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य करत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगchinaचीन