पुलवामा हल्ला: गुप्त माहितीकडे मोदींनी दुर्लक्ष का केले?; राहुल गांधी

By देवेश फडके | Published: February 16, 2021 12:56 PM2021-02-16T12:56:36+5:302021-02-16T12:59:34+5:30

पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

congress leader rahul gandhi asked why were actionable intelligence inputs ignored | पुलवामा हल्ला: गुप्त माहितीकडे मोदींनी दुर्लक्ष का केले?; राहुल गांधी

पुलवामा हल्ला: गुप्त माहितीकडे मोदींनी दुर्लक्ष का केले?; राहुल गांधी

Next
ठळक मुद्देपुलवामा हल्ल्यावरून राहुल गांधीचे टीकास्त्रगुप्त माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा दावाट्विट करत केली मोदी सरकारवर जोरदार टीका

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. (congress leader rahul gandhi asked why were actionable intelligence inputs ignored)

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान मोदी चित्रीकरण करण्यात व्यस्त होते. पुलवामा येथे आपल्या जवानांना मरण्यासाठी सोडून दिले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, पुलवामा येथे हल्ला होणार याची गुप्त माहिती आधीच मिळाली होती. असे असतानाही पंतप्रधान मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले. गुप्त माहितीवर वेळीच कारवाई करायला हवी होती, त्याकडे डोळेझाक का करण्यात आले, अशी विचारणा राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काँग्रेसने संरक्षण बजेटवरून मोदी सरकारची जोरदार टीका केली होती. भारतीय सैन्य दोन आघाड्यांवर लढत आहे. एकीकडे पाकिस्तान, तर दुसरीकडे चीनचे मोठे आव्हान देशासमोर आहे. अशा परिस्थितीत संरक्षण बजेट कमी करून मोदी सरकारने जवानांचे मनोधैर्य कमकुवत केले आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आली. 

नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका

दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलावामा येथे CRPF जवानांच्या एका तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवानांना हौतात्म्य आले होते, तर अनेक जण जखमी झाले होते. याच दिवशी पंतप्रधान मोदी डिस्कव्हरी वाहिनीसाठी बियर ग्रिल्स यांच्यासोबत भारतीय जंगलात चित्रिकरण करत होते. यावरूनही विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली होती. 

Web Title: congress leader rahul gandhi asked why were actionable intelligence inputs ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.