शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात प्रियांका असणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा; काँग्रेस स्वतंत्रपणे लढवणार सर्व जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 12:23 IST

"काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही."

रायपूर - उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहेत. लोकांना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. येथे पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करेल. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

कोणत्याही पक्षाशी आघाडीसंदर्भात चर्चा नाही, पक्ष सर्व जागा लढणार -राजेश तिवारी म्हणाले, काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. समाजवादी पक्ष किंवा राज्यातील इतर कोणत्याही पक्षाशी युती करण्याची चर्चा नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसला बूथ स्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, ज्याप्रमाणे छत्तीसगडमध्ये 15 वर्षे सत्तेबाहेर राहिल्यानंतर बूथ स्तरावर जोरदार यश मिळाले आहे, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातही प्रयोग केले जात आहेत, असेही तिवारी म्हणाले.

उत्तर प्रदेशात दंगलींनाच चांगली कामगिरी म्हणतात; राहुल, प्रियांका गांधी यांचे टीकास्त्र 

उत्तर प्रदेशातील 100 हून अधिक नेत्यांना छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण  -हे लक्षात घेण्यासारखे आहे, की उत्तर प्रदेशचे 100 हून अधिक अधिकारी गेल्या तीन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. या नेत्यांना बूथ व्यवस्थापनापासून ते काँग्रेसच्या इतिहासापर्यंत माहिती दिली जात आहे. त्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही प्रशिक्षण दिले. 

राजेश तिवारी म्हणाले, रायपूरमधील निरंजन धर्मशाला येथे मास्टर ट्रेनर्सना बूथ व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. प्रियांका गांधीही बुधवारी सायंकाळी या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात व्हर्च्युअली सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रियंका यांनी आतापर्यंतच्या प्रशिक्षणाची माहिती घेतली. हे मास्टर ट्रेनर आता उत्तर प्रदेशातील जिल्हा, विधानसभा आणि ब्लॉक स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देतील. 

 

टॅग्स :Priyanka Chopraप्रियंका चोप्राcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक