शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हुकूमशाही राजवटीच्या विरोधात असलेल्या 'INDIA'ला मतदान करा; नवज्योतसिंग सिद्धूंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 13:23 IST

opposition meeting in bangalore : आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' विरूद्ध 'एनडीए' असा सामना रंगणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाला सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला 'INDIA' असे नाव देण्यात आले असून आगामी लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' विरूद्ध 'एनडीए' असा सामना रंगणार आहे. मंगळवारी बंगळुरू येथे विरोधकांनी बैठक घेत आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. विरोधकांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील 'INDIA'ला मतदान करण्याचे आवाहन करताना भाजपा सरकारवर टीका केली.

"लोकशाहीच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, लोकांच्या सत्तेच्या नावाखाली हुकूमशहा म्हणून राज्य करणाऱ्यांनी देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या एजन्सींना गुलाम बनवत राहिल्यास संवैधानिक मूल्ये नष्ट होतील. 'महाभारत' ही चांगली आणि वाईट यांच्यातील लढाई होती. ही लोकशाहीवादी आणि लोकशाहीविरोधी यांच्यातील लढाई आहे. क्षुल्लक स्वार्थी लाभ विसरण्याची वेळ आली आहे. स्वार्थी राजकारणाचा त्याग करून 'सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष'च्या सक्षमीकरणासाठी कार्य करायला हवे. भारताचे लोकशाही प्रजासत्ताक हे आमच्या पूर्वजांनी दिलेली देणगी आहे", अशा शब्दांत नवज्योतसिंग सिद्धूंनी सरकारला लक्ष्य केले. 

तसेच भारतीय राष्ट्रीय विकासात्मक सर्वसमावेशक आघाडी (Indian National Developmental Inclusive Alliance) हा आवाज आहे, जो आपल्या घटनात्मक मूल्यांचे रक्षण करेल आणि लोकांच्या प्रश्नांसाठी लढेल. भारतातील जनतेकडे आता एक पर्याय आहे. इंडिया या आघाडीला मतदान म्हणजे हुकूमशाही राजवटीच्या विरोधात मतदान असून लोकशाही वाचवणाऱ्यांना मतदान करा, असे आवाहन सिंद्धूंनी केले.

विरोधी आघाडीच्या INDIA चा अर्थ काय?

  • I - भारतीय (Indian)
  • N - राष्ट्रीय (National)
  • D - विकासात्मक (Developmental) 
  • I - सर्वसमावेशक (Inclusive) 
  • A - आघाडी (Alliance) 
  •  आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी बंगळुरू येथे विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली अन् INDIA या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव राहुल गांधी यांनी मांडला होता. खरं तर विरोधकांची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.  
टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाBengaluruबेंगळूर