शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

कपिल सिब्बल भाजपा अन् संघाची भाषा बोलताहेत, काँग्रेस नेत्यांची परखड टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 07:24 IST

सिब्बल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत, असा आरोप या नेत्यांनी केला आहे.

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेेते कपिल सिब्बल यांंनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्ष नेतृत्वाविरुद्ध केलेल्या टिप्पणीवरून  लोकसभेतील काँग्रेसच्या प्रतोदासह  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कपिल सिब्बल यांच्यावर परखड टीका केली. सिब्बल हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बोलत आहेत, असा आरोप या नेत्यांनी केला आहे.

लोकसभेतील काँग्रेसचे प्रतोद मणिकम टागोर यांनी म्हटले की, गांधी परिवाराने नेतृत्व  सोडावे, असे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला का वाटते? कारण काँग्रेस पक्ष आणि भारतीय विचार संपविता येतील. हे कपिल सिब्बल जाणून आहेत; परंतु ते भाजप आणि संघाची भाषा का बोलत आहेत?

पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास स्वतंत्र....काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी सिब्बल यांनी ट्विटरवर म्हटले की,   नेतृत्वाविरुद्ध ऊठसूट जाहीर बोलण्याऐवजी सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवायला पाहिजे. डॉ. हर्षवर्धन यांनी तुम्हाला चांदणी चौकातून माघार घेण्यास सांगितले नव्हते.  त्यांनी निवडणूक लढवून तुम्हाला पराभूत केले. रोज नेतृत्वाविरुद्ध बोलण्याएवेजी ज्यांना पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे, ते पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास स्वतंत्र आहेत.

घर की नव्हे, सब की काँग्रेस हवी....गांधी परिवाराने नेतृत्वापासून दूर होऊन अन्य नेत्याला पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे. मला ‘सब की काँग्रेस’ हवी आहे. काहींना मात्र ‘घर की काँग्रेस’ हवी, अशी टिप्पणी सिब्बल यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

रविवारच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्ष  सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून  संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत त्यांनीच अध्यक्षपदी राहून पक्ष  बळकट करण्यासाठी पावले उचलावीत, असा निर्णय घेण्यात आला होता. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस