शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भगवे वस्त्र घालणारे मंदिरांमध्ये बलात्कार करतायेत, दिग्विजय सिंहांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 18:18 IST

वादग्रस्त विधानावरुन राजकीय घमासान होण्याची चिन्हे

भोपाळ: आपल्या विधानांमुळे सातत्याने चर्चेत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन राजकीय घमासान होण्याची चिन्हे आहेत. भगवे वस्त्र घालून बलात्कार होत आहेत आणि मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत. आपल्या सनातन धर्माला ज्यांनी बदनाम केले, त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.  

दिग्विजय सिंह म्हणाले, "व्यक्ती आपले कुटुंब सोडून साधू बनतो. धर्माचे आचरण करतेवेळी आध्यात्माकडे वळतो. मात्र, आज लोक भगवे वस्त्र घालून चूर्ण वाटत आहेत. भगवे वस्त्र घालून बलात्कार होत आहेत. मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत. हा आपला धर्म आहे का? आपल्या सनातन धर्माला ज्यांनी बदनाम केले आहे. त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही."

'जय श्रीराम नाऱ्यावर एका पार्टीने ताबा घेतला आहे' जय श्रीराम नाऱ्यावर एका पार्टीने ताबा घेतला आहे. त्यामुळे आपल्याला जय सिताराम म्हटले पाहिजे, असे सांगत दिग्विजय सिंह यांनी भाजपावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. पार्टीचे लोक मंदिरांमध्ये आणि मठांमध्ये ताबा घेत आहेत, असेही दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. 

'भाजपाने आम्हाला राष्ट्रीयतेचा धडा शिकवू नये' आमची विचारसरणीची लढाई भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यासोबत आहे. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कधीच भाग घेतला नाही. ते आम्हाला राष्ट्रीयतेचा धडा शिकवू पाहत आहेत, दिग्विजय सिंह म्हणाले. तसेच, 1947 च्या आधी हे लोक कोठे होते? ज्यावेळी इंदिरांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, त्यावेळी हे लोक कोठे होते? असा सवाल करत आम्हाला राष्ट्रीयतेचा धडा शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत दिग्विजय सिंह यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस