शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फक्त गाढवाचीच छाती 56 इंचाची, काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 13:33 IST

2014 साली नरेंद्र मोदी यांच्याकडून देश चालविण्यासाठी 56 इंच छातीची गरज असते असं विधान केलं होतं त्यावरून अर्जुन मोढवाडिया यांनी मोदींवर टीका केली आहे. 

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष एकमेकांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यातूनच नेत्यांची वादग्रस्त विधाने समोर येत आहे. गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना आपत्तीजनक विधान केलं. मंगळवारी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना केवळ गाढवाची छाती 56 इंचाची असते असं वादग्रस्त विधान केलं. 

अर्जुन मोढवाडिया यांना बनासकंठा जिल्ह्यातील दीसा येथे एका रॅलीत हे वक्तव्य केले आहे. 2014 साली नरेंद्र मोदी यांच्याकडून देश चालविण्यासाठी 56 इंच छातीची गरज असते असं विधान केलं होतं त्यावरून अर्जुन मोढवाडिया यांनी मोदींवर टीका केली आहे. 

काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी आपल्या भाषणात बोलताना एका सामान्य व्यक्तीची छाती 36 इंच असते, बॉडी बिल्डर व्यक्तीची छाती 42 इंच असू शकते. फक्त गाढवाची छाती 56 इंच असते तर बैलाची छाती 100 इंच असते असं सांगितले. त्याचसोबत मोदीभक्त ही गोष्ट समजू शकत नाहीत, जेव्हा कोणी त्यांच्या नेत्याला 56 इंच छातीचा नेता म्हणतं तेव्हा ते आनंदी होतात असा टोलाही अर्जुन मोढवाडिया यांनी भाजपाला लगावला.

अर्जुन मोढवाडिया यांच्या विधानावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. पराभवाच्या भितीने काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक संतूलन बिघडत आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून अशाप्रकारे शब्दप्रयोग केले जात आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्याचा आणि पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या भाषेचा राज्यातील जनता मतदानातून योग्य ते उत्तर देईल असा विश्वास भाजपाचे प्रवक्ते भरत पांड्या यांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशात एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 56 इंच छातीचा भाषणात उल्लेख करण्यात आला होता. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांच्याविरोधात भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी या शब्दाचा वापर केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी गुजरातमधील सर्व 26 जागांवर मतदान होणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019banaskantha-pcबनसकंठाcongressकाँग्रेस