शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसनं कर्नाटकाला IT Hub बनवलं; भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवतेय!!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 12:48 IST

कर्नाटकमधील भाजप नेता आणि मंत्री रमेश जारकीहोळी यांची सीडी व्हायरल; भाई जगताप यांचा सणसणीत टोला

मुंबई/बंगळुरू: कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून (Karnataka Sex CD Scandal) मोठी खळबळ उडाली आहे. जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांची सीडी समोर आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या बदनामीसाठी राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचा दावा जारकीहोळींनी सुरुवातीला केला होता. मात्र या प्रकरणामुळे सरकारच्या अडचणी वाढू लागल्यानं अखेर जारकीहोळींना राजीनामा द्यावा लागला.आक्षेपार्ह सीडीमुळे भाजप नेत्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत सणसणीत टोला लगावला आहे. 'काँग्रेसनेकर्नाटकाला IT Hub बनवले. भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे..!!', असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकची ओळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकची ही ओळख आणि भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण यावरून जगताप यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.आक्षेपार्ह सीडी प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं; रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

काय आहे प्रकरण?नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणलं. तसंच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला. ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेवण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे.

संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असं दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटलं आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसbhai jagtapअशोक जगताप