शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Kapil Sibal On Congress : कपिल सिब्बल कोण, कुठचे नेते? अधीर रंजन, खर्गेंनी चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 14:04 IST

Kapil Sibal On Congress :'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' या सिब्बल यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे.

Kapil Sibal On Congress : पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसतायत. काँग्रेसमध्ये सध्या दोन गट दिसत असून एक गट आपल्याच पक्षावर टीक करत आहे, तर दुसरा गट टीका करणाऱ्या नेत्यांनाच पराभवासाठी जबाबदार मानत आहे. 'घरची नाही, सर्वांची काँग्रेस' या सिब्बल यांच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा साधला. "ते एक चांगले वकील असू शकतात. परंतु चांगले नेते नाहीत. ते कधीही कोणत्याही गावात काँग्रेसचं काम करण्यासाठी गेले नाहीत. ते जाणूनबुजून पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला कोणीही कमकुवत करू शकत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं," अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.

"त्यांना जनमत नाही"काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीदेखील सिब्बल यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "त्यांना कोणतंही जनमत नाही. ते कोण आणि कुठचे नेते आहेत, याची कल्पना नाही. ते काँग्रेसच्या समर्थनाशिवाय काहीही करू शकत नाहीत. आपल्या हिंमतीवर ते लढूही शकत नाहीत. अशात एसी खोलीत बसून मुलाखत देण्याचा काय अर्थ? जेव्हा ते युपीए सरकारमध्ये मंत्री होते, तेव्हा सर्वकाही चांगलं होतं. परंतु आता पक्ष सत्तेत नाही, तर त्यांना सगळंच वाईट दिसत आहे," असं ते म्हणाले.काय म्हणाले होते सिब्बल?"पक्षाचे नेतृत्व कोकीळेच्या धरतीवर (अर्थात सर्व काही ठीक आहे, असे वाटणे, पण वास्तविकतेशी संबंध नसणे.) जगत आहे. ८ वर्षांपासून पक्षाची सातत्याने घसरण होत असतानाही ते जागे होत नाहीत. ही काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे," असं सिब्बल इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखीदरम्यान म्हणाले होते. "दुर्दैवाची गोष्ट आहे, की काही एबीसी लोकांना वाटते, की घरच्या काँग्रेसशिवाय सर्वांची काँग्रेस चालूच शकत नाही. आपल्यासाठी हेच आव्हान आहे. मी कोणत्याही एबीसीविरोधात नाही. मात्र, आपल्याला हे आव्हान स्वीकारावे लागेल," असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी