शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसची हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 08:36 IST

कर्नाटकमध्ये होणाऱ्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

बंगळुरू  - राज्यात होणाऱ्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकमध्ये तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी रात्री जनता दल सेक्युलरच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेस महासचिव सी. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. " काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे दोन्ही पक्ष आगामी पोटनिवडणुकीत भाजपाला धूळ चारण्यासाठी एकत्रित प्रचार करतील. तसेच एकत्र निवडणूक लढवतील. तसेच तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदार संघात होत असलेल्या या पोटनिवडणुकीत पाचही जागांवर कब्जा करण्याचा आमचा प्रयत्न असेल.धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजपाला पराभूत करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. " असे सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर यांच्यात आघाडीसाठी चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीस माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा, पक्षाचे महासचिव दानिश अली, काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे उपस्थित होते.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)BJPभाजपा