शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

"पंतप्रधान मोदी विनेश फोगटला कॉल करणार का?"; काँग्रेस नेत्याने विचारला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 11:56 IST

Vinesh Phogat And Narendra Modi : काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विनेश फोगटने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये, विनेश फोगटने ५० किलो कुस्तीच्या सामन्यात क्युबाच्या युसनेलिस युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करून इतिहास रचला. यासह भारताचं मेडल आता निश्चित झालं आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विनेश फोगटने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचं सिल्वर किंवा गोल्ड मेडल पक्क असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान तिला कॉल करणार का? असा खोचक सवाल देखील विचारला आहे. 

जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचं सिल्वर किंवा गोल्ड मेडल निश्चित आहे. नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधान तिला कॉल करतील का? अर्थात तिचं अभिनंदन करण्यासाठीच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महिला कुस्तीपटूंनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांच्यासोबत जे गैरवर्तन केलं त्यासाठी माफी मागणार का?" असंही म्हटलं आहे. 

विनेश फोगटचे काका महावीर फोगट म्हणाले की, "आम्हाला पूर्ण आशा आहे की, ती गोल्ड मेडल मिळवेल. ती खूप चांगली खेळली आणि भविष्यातही चांगली खेळेल. संपूर्ण देश आनंदी आहे." याशिवाय बजरंग पुनियानेही भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

विनेशच्या विजयानंतर बजरंग पुनियाचा खोचक टोला

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "विनेशच्या विजयावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे मला समजत नाही. पहिल्यांदाच, आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे मला समजत नाही. संपूर्ण भारतच या मेडलची आतुरतेने वाट पाहत आहे." 

"विनेशने इतिहास रचला आहे. विनेश महिला कुस्तीमध्ये ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.आज सर्व भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. या देशाच्या कन्या आहेत, ज्यांनी नेहमीच देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ज्यांनी या मुलींच्या मार्गात नेहमीच काटे आणले आहेत, त्यांनी निदान या मुलींकडून आता तरी धडा घ्यावा. म्हणजे भविष्यात या मुलींच्या मार्गात काटे पेरण्यापासून परावृत्त होतील" असंही बजरंग पुनिया यांने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा