शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
4
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
5
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
6
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
7
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
8
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
9
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
10
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
11
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
12
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
13
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
14
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
15
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
16
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
17
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
18
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
19
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:52 IST

Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे.

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. तसेच या निर्णयांवर भारत ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारत काय करू शकतो, याची एक चुणूक पाकिस्तानसह जगाला दाखवण्यात आली आहे.  ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करण्यात आला. यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने केलेल्या कुरापतीला चोख प्रत्युत्तर भारताने दिले.  यानंतर आता भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडणार आहेत. यातच राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. याला भाजपाने प्रत्युत्तर दिले. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक महिला उलटला. परंतु, या कटात सामील असलेले दहशतवादी सापडले नसल्याबाबत काँग्रेसने केंद्र सरकारला थेट सवाल केला आहे.

राहुल गांधी पाकिस्तानला ऑक्सिजन देत आहेत, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. चीनने पाकिस्तानला ऑक्सिजन दिला आहे, चीनच्या मदतीशिवाय पाकिस्तान युद्ध लढू शकला नसता, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. 

नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, आंबे कोणी पाठवले 

पाकिस्तानला क्लीन चिट कोणी दिली, जिन्ना यांना क्लीन चिट कोणी दिली, लालकृष्ण अडवाणींनी दिली. जिन्ना यांची प्रशंसा कोणी केली, जसवंत सिंह यांनी केली. लाहोर बस कोणी सुरू केला, अटल बिहारी वाजपेयींनी केला. नवाज शरीफ यांच्यासोबत नाश्ता करायला कोण गेले होते, नरेंद्र मोदी गेले होते. आंबे कोणी पाठवले होते, शाल कोणी पाठवली होती, नरेंद्र मोदींनी पाठवली होती, असा पलटवार जयराम रमेश यांनी केला. 

दहशतवादी पकडले गेले नाहीत, त्यांना अटक करा

आम्ही इकडे कागदपत्रे तयार करत आहोत; पण, दहशतवादी तिथे फिरत आहेत. दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. त्यांना अटक करा. दहशतवादी कुठे आहेत? एक महिना उलटणार आहे. त्यांच्याबद्दल माहिती कुठे आहे? २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी मारले गेले आणि एकाला अटक करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली, असा दावा जयराम रमेश यांनी केला. 

दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत जगाला माहिती देण्यासाठी पाठवण्यात आलेले शिष्टमंडळ हे केवळ पंतप्रधान मोदी यांचा यावरून लक्ष विचलित करण्याचा आणि जनसंपर्क वाढण्याचा प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकार संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावत नाही? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे, याची आठवण जयराम रमेश यांनी करून दिली. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरcongressकाँग्रेसIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक