शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

सततच्या पराभवांमुळे काँग्रेसमध्ये खळबळ, संघटनेत होणार मोठे फेरबदल, राहुल गांधींचा प्लॅन तयार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 16:14 IST

Congress News: फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत सत्ता मिळाली नसली तरी मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे काँग्रेसला हुरूप आला होता. मात्र नंतर मागच्या सात आठ महिन्यांच्या काळात झालेल्या हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली, तर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत खळबळ उडाली असून, पराभवातून धडा घेत पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत बदलांची ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होणार होती. मात्र हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुकांमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर पक्षसंघटनेत तातडीने बदल करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेत बदल करण्याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांना संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेही उपस्थित होते.  काँग्रेच्या संघटनेमध्ये मुलभूत आणि व्यापक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संघटनेच्या सरचिटणीसांचं काम तीन भागात विभागलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या तीन भागांसाठी तीन वेगवेगळे सरचिटणीस नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाध्यक्षपदानंतर सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या या पदाची शक्ती कमी होणार आहे. सद्यस्थितीत के. सी. वेणुगोपाल हे या पदावर आहेत. तसेच ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असून, ते पक्षसंघटनेतील बलाढ्य नेते मानले जातात. आता या पदाच्या अधिकारांची विभागणी झाल्यास वेणुगोपाल यांची ताकद विभागली जाऊ शकते.

सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसकडून सुमारे सहा नवे सरचिटणीस नियुक्त करणार आहे. तर काही जणांना नारळ दिला जाईल.  तसेच बिहार, राजस्थान, तेलंगाणा, हरयाणा, पंजाब आणि आसाम या राज्यातील प्रभारी बदलले जाऊ शकतात. तसेच महाराष्ट्र, ओदिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांसह एकूण आठ राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ हे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात.

सध्या प्रियंका गांधी ह्या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. मात्र त्यांच्याकडे कुठल्याही राज्याचा प्रभार नाही आहे. त्यांच्याकडे कुठल्याही मोठ्या राज्याचं प्रभारीपद सोपवलं जाऊ शकतं. बी. के. हरिप्रसाद, सचिन राव, मीनाक्षी नटराजन, श्रीनिवास बी.व्ही, परगट सिंह, अजयकुमार लल्लू, जिग्नेश मेवाणी आदी नेत्यांकडेही महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे