शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 19:25 IST

Lok Sabha Election 2024: काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते.

मागच्या काही वर्षांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून सुरू असलेल्या कारवायांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सातत्याने लक्ष्य करत असतात. त्यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. नेहरूंनी केलेल्या चुकांसाठी काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदार धरतेय, अशी टीका जयशंकर यांनी केली आहे. 

जयशंकर चीनबाबतच्या धोरणाबाबत म्हणाले की, चीनबाबत नरेंद्र मोदी यांची भूमिका ही स्पष्ट राहिलेली आहे. सत्तेत आल्यापासून भाजपा सरकारने एलएसीजवळच्या भागात वेगाने बांधकाम सुरू केलं आहे. आतापर्यंत अनेक रस्ते आणि बोगद्यांचं काम झालं आहे. असं असतानाही काँग्रेकडून चीन भारताच्या जमिनीवर कब्जा करतेय, असा आरोप केला जातोय. काँग्रेस चीनबाबत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या चुकांसाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवते. तसेच यामध्ये नेहरूंचा काही दोष नाही, असे दाखवण्याचा प्रयत्न करते. लडाख आणि अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या आक्रमणाबाबत जयशंकर म्हणाले की, चीनने १९५८ आणि १९६२ मध्ये भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता. 

यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही जयशंकर यांनी टीका केली. आपल्याच सुरक्षा दलांवर टीका करणे दु:खद बाब आहे. जेव्हा तुम्ही चीनने जमीन घेतली म्हणता तेव्हा ती १९६२ मध्येच गेली, हे समजून घेतलं पाहिजे. सध्या देशाची दिशाभूल केली जात आहे. सध्या भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये अधिकच तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिकाधिक सैनिक तैनात केलेल आहे, असे जयशंकर म्हणाले.

चीनकडून सीमारेषेवर गाव वसवले जात असल्याच्या प्रश्नालाही जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे. काही लोक म्हणतात की, चिनी लोक सीमेवर गाव वसवत आहेत. मात्र हे बांधकाम लोंगजू येथे होत आहे. त्यावर चीनने १९५९ मध्ये हल्ला करून कब्जा केला होता. मात्र तुम्ही गुगल मॅपवर ते गावा पाहा आणि त्याबाबत १९५९  मध्ये जवाहरलाल नेहरूंनी केलेलं भाषण समजून घ्या. राहुल गांधी लडाखमधील पँगाँग सरोवरात चीनने पूल बांधल्याचे सांगत आहेत. मात्र ते पूल त्या जागी बांधण्यात आलं आहे जिथे १९५८ मध्ये चिनी आले होते. तसेच त्यांनी १९६२ मध्ये त्यावर कब्जा केला होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीS. Jaishankarएस. जयशंकरJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेस