शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

'काँग्रेस भाजपची बी-टीम...', सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 19:35 IST

विरोधकांच्या इंडिया आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव सातत्याने काँग्रेसवर टीका करत आहेत.

Congress vs Samajwadi Party: विरोधकांनी स्थापन केलेल्या INDIA आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) सातत्याने काँग्रेसवर (Congress) निशाणा साधत आहेत. अलीकडेच त्यांनी मध्य प्रदेशातील एका सभेतून काँग्रेसवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

'काँग्रेसला समाजवादी पक्षाला त्याचा मित्र म्हणून नकोय. आज काँग्रेस आम आदमी पार्टीच्या विरोधातही बोलत आहे. काँग्रेसकडे छोट्या पक्षांना सोबत घेण्याची संधी होती. त्यांना वाटते की, जनता त्यांच्यासोबत आहे, परंतु पीडीए यावेळी त्यांना उत्तर देईल.' यावेळी अखिलेश यांनी काँग्रेसला भाजपची 'बी टीम' म्हटले. 

भाजपवरही टीकाअखिलेश यांनी यावेळी भाजपवरही टीका केली. काँग्रेस आणि भाजप पीडीए-मागास, दलित आणि आदिवासी वर्गांना आकर्षित करण्यासाठी जात जनगणना आणि आरक्षणावर भाष्य करत आहेत, परंतु काँग्रेसनेच जात जनगणना थांबवली आणि मंडल आयोगाचा अहवाल नाकारुन अंमलबजावणी करण्यास नकार दिला. भाजपही तोच मार्ग अवलंबत असल्याचे अखिलेश म्हणाले.

काँग्रेस कपटी पक्ष, मतदान करू नकादरम्यान, रविवारी(दि.5) मध्य प्रदेशातील टिकमगड येथील रॅलीला संबोधित करताना अखिलेश यांनी काँग्रेसला कपटी पार्टी म्हणत, नागरिकांना काँग्रेसला मतदान न करण्याचे आवाहन केले. काँगग्रेस पक्षाबाबत नेहमी सावधगिरी बाळगा. ते आमचा विश्वासघात करू शकतात, मग तुम्ही त्यांच्यासाठी कोण आहात. काँग्रेसनेही जातीवर आधारित जनगणनेची मागणी सुरू केली, कारण त्यांची सर्व मते भाजपला गेली आहेत. ही मते परत मिळविण्यासाठी काँग्रेस जात जनगणनेची मागणी करत आहे, अशी टीका अखिलेश यादवांनी यावेळी केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा