नर्तिकेच्या ठुमक्यांमध्येच काँग्रेसला रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:43 IST2018-06-27T05:43:34+5:302018-06-27T05:43:52+5:30

हरयाणातील प्रख्यात गायिका, अभिनेत्री व नृत्यांगना सपना चौधरी हिने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेताच, त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली

The Congress is interested in the dancers | नर्तिकेच्या ठुमक्यांमध्येच काँग्रेसला रस

नर्तिकेच्या ठुमक्यांमध्येच काँग्रेसला रस

नवी दिल्ली : हरयाणातील प्रख्यात गायिका, अभिनेत्री व नृत्यांगना सपना चौधरी हिने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेताच, त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे भाजपाचे खासदार अश्विनीकुमार चोप्रा यांनी ठुमके लावणाऱ्यांना काँग्रेस नाचवू पाहत आहे, असे आक्षेपार्ह विधान केले.
खा. अश्विनीकुमार चोप्रा हे पंजाब केसरी या दैनिकाचे संपादक व खासदार आहेत. त्यांनी सपना चौधरीला ‘ठुमकेवाली’ म्हणताच, तिनेही त्यांना लगेच सुनावले. खा. चोप्रा हे केवळ माझे ठुमकेच पाहत असतील, त्यांना माझ्या गाण्यांविषयी व अभिनयाविषयी माहिती दिसत नाही, असे तिने म्हटले आहे.
सपना चौधरी ही २८ वर्षे वयाची गायिका असून, तिने काही चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत आणि गायिका म्हणूनही ती हरयाणा, पंजाबमध्ये लोकप्रिय आहे. गेल्या आठवड्यामध्ये तिने सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर, आपणा काँग्रेसचा प्रचार करू इच्छितो, असेही तिने जाहीर केले. त्यानंतर खा. चोप्रा यांनी लगेचच तिचा उल्लेख ‘ठुमकेवाली’ असा केला. त्यावर सपना चौधरी म्हणाली की, माझे केवळ ठुमके पाहणाºया खासदार महोदयांचे मी आभार मानते. कौतुक केल्याबद्दल आभार, पण एखाद्या व्यक्तीविषयी माहिती नसताना बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

मला राजकारणात येण्याची इच्छा नाही. तसा माझा विचारही नाही, पण गांधी कुटुंबीयांविषयी मला आदर आहे. त्यांनी देशासाठी खूप काही केले आहे. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटले. काँग्रेससाठी प्रचार करण्याचा माझा विचार आहे. - सपना चौधरी

Web Title: The Congress is interested in the dancers