शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

काँग्रेसने पाठवली खास भेट; पण पैसे भरावे लागणार नरेंद्र मोदींना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 7:35 PM

संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे.

नवी दिल्ली:  नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरुन आणि  प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत अ‍ॅमेझॉनवरून भेट म्हणून पाठवली आहे. 

काँग्रेसने संविधानाची प्रत दिल्लीमधील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवली असून या प्रतची किंमत 170 रुपये आहे. अ‍ॅमेझॉनवरून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून संविधानाची प्रत पाठवल्याने 170 रुपये देखील नरेंद्र मोदी यांनाच भरावे लागणार आहे.काँग्रेसने ट्विट करुन प्रिय पंतप्रधान मोदीजी, तुम्हाला संविधानाची एक प्रत पाठवली आहे. लवकरच तुम्हाला ती मिळेल. देशामध्ये फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर कृपया संविधान नक्की वाचा असा टोलाही काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. 

संविधानाच्या अनुच्छेद १४ नुसार देशातील सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे, हे भाजपला अजून समजलेलं नसल्याची टीका काँग्रेसने भाजपावर केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला भाजपा काय प्रत्युत्तर देणार हे आगामी काळातचं समजणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसConstitution Dayसंविधान दिनIndiaभारत