काँग्रेसने शहराचा विकास रखडवला

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:20+5:302015-02-18T00:13:20+5:30

राष्ट्रवादीचा आरोप : अंतर्गत वादामुळे प्रश्न प्रलंबित

Congress has laid the foundation for the development of the city | काँग्रेसने शहराचा विकास रखडवला

काँग्रेसने शहराचा विकास रखडवला

ष्ट्रवादीचा आरोप : अंतर्गत वादामुळे प्रश्न प्रलंबित
भोर : मागील सहा महिन्यांपासून काँॅग्रेसने वाद करून शहराचा विकास रखडवला असून, विकासकामात राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी व भाजपाने केला आहे.
सोमवारी सायंकाळी त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन वरील आरोप केला. या वेळी नगरसेवक यशवंत डाळ, भाजपाचे शहराध्यक्ष राजू गुरव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, सुनीता बदक, विजय रावळ, विवेक पाटणकर, समीर घोडेकर, पंकज लिमये, रोहन पाडळे, सनी बारंगळे, वरद पोपट, सक्ले शिकलकर व नागरिक उपस्थित होते.
भूमिपूजन केलेल्यापैकी एकही कामे सुरू नाही, सुरूकामे अर्धवट आहेत. लोकांना वेठीस धरत आहेत. मात्र आम्ही शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार्‍या विषयांना मंजुरी देऊन जनतेबरोबर असल्याचे सिद्ध केले असल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सांगितले.
काँग्रेसचे नगरसेवक सहा महिन्यांपासून कोणत्याच विषयांना मंजुरी देत नाहीत. त्यामुळे शहरात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. कचर्‍याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणी विभागातील कर्मचारी अरेरावी करतात, नागरिकांशी उद्धट बोलतात. कोणतीच कामे होत नाहीत. त्यामुळे भोर नगरपलिका बरखास्त करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
(संपादन : बापू बैलकर)

Web Title: Congress has laid the foundation for the development of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.