शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पटेल यांच्या अल्टिमेटमला काँग्रेसने दिले उत्तर, पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत घेतली अशी भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 21:32 IST

पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अहमदाबाद - पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत कायदेशीर सल्ला घेईल आणि त्यानुसार आपली पुढील वाटचाल ठरवेल, असे त्यांनी म्हटले आहे. पाटीदारांचे नेते हार्दिक पटेल यांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेपूर्वी पाटीदारांच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे अल्टिमेटम दिले होते. काँग्रेस संविधानाच्या चौकटीत राहून पाटीदारांना कसे आरक्षण देईल. याबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी हार्दिक पटेल यांनी केली होती.  त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पाटीदार नेते आणि आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काँग्रेसने आपली भूमिका मांडल्यानंतर पाटीदारांनी 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेत हार्दिक पटेल जाणार नाहीत, असा निर्णय घेतला. तसेच आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी काँग्रेसला 7 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.  गुजरातमध्ये दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळेच सध्या गुजरातमधील भाजपा आणि मोदींच्या विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र भाजपाने विकास आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. तसेच पाटीदार हे पारंपरिक मतदार असून, भाजपालाच मत देतील, असा विश्वास भाजपाचे नेते व्यक्त करत आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राहुल गांधी आणि हार्दिक पटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या अपेक्षाही वाढल्या  होत्या. मात्र दरम्यान हार्दिक पटेल यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसला अल्टिमेटम दिले होते. हार्दिक पटेलनी काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल, असं सांगितलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.  हार्दिक पटेल यांनी शनिवारी ट्विट केलं आहे. ट्विटरवरुन अल्टिमेटम देताना हार्दिक पटेलने लिहिले होते की, '3/11/2017 पर्यंत काँग्रेसने पाटीदार समाजाला घटनात्मक आरक्षण कसे देणार, यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. आपली भूमिका स्पष्ट केली नाहीत तर सुरतमध्ये जे अमित शहांसोबत झालं तसंच तुमच्यासोबत होईल'.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा