शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
4
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
5
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
6
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
7
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
8
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
9
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
10
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
11
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
12
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
13
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
15
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
16
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
17
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
18
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
19
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
20
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन

राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:29 IST

राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली.

जयपूर : राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. त्यामुळे बहुजन समाज पार्टी व काही अपक्ष यांच्या पाठिंब्यावरच काँग्रेसचे सरकार बनणार, हे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी आटोपताच काँग्रेस विधिमंडळाची बैठकही जयपूरमध्ये पारही पडली. राज्याचा मुख्यमंत्री ़निवडल्यानंतर गुरुवारीच शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र होणाऱ्या मुख्यमंत्र्यासाठी हे सरकार चालवणे तारेवरील कसरतच असेल.राजस्थानच्या सरकारमध्ये बहुजन समाज पार्टीचा एक मंत्री असणार, हेही नक्की ठरले आहे. बसपाने पाठिंबा जाहीर केला आहेच. तिथे त्या पक्षाचे सहा आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसचे चार बंडखोरही निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही खुश ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागेल.राजस्थानातील स्थिती चांगली नाही, हे लक्षात येताच, काहीही करून पुन्हा सत्तेत येण्यास भाजपा व अमित शहा यांनी जंगजंग पछाडले होते, हेही विसरून चालणार नाही. त्यात भाजपा थोडासा जरी कमी पडला असता, तर काँग्रेसची संख्या १२0 झाली असती.सत्तेत येण्याची लक्षणे दिसू लागताच काँग्रेस पक्ष प्रचारात मागे पडला. भाजपाने अचानक प्रचारात बाजी मारल्यामुळे फासे पलटण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. पण राहुल गांधी यांना त्याचा अंदाज आला. त्यांनी लगेचच वॉर रुम स्थापन करून, तिथे थेट अहमद पटेल यांनाच बसवले. त्याचा मोठा फायदा झाला.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा