शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"राजीव गांधी फाउंडेशनसाठी काँग्रेसने मेहूल चोक्सीकडून घेतली होती देणगी’’ भाजपाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 17:49 IST

राजीव गांधी फाऊंडेशनसाठी काँग्रेसने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मेहूल चोक्सीकडून देणगी स्वीकारली होती, असा गंभीर आरोप आज भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे.

नवी दिल्ली - राजीव गांधी फाऊंडेशनवरून सध्या भाजपाकडूनकाँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, या राजीव गांधी फाऊंडेशनसाठी काँग्रेसने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मेहूल चोक्सीकडून देणगी स्वीकारली होती, असा गंभीर आरोप आज भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे. तसेच मेहूल चोक्सी आणि राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये नेमके काय संबंध आहेत, याचा खुलासा व्हायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राजीव गांधी फाऊंडेशनवर गंभीर आरोप करताना भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनसाठी मेहूल चोक्सीकडून का देणगी घेतली होती. तसेच त्याला कर्ज का दिले होते. मेहूल चोक्सीने राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी का दिली होती आणि मेहूल चोक्सी आणि राजीव गांधी फाऊंडेशन यांच्याता काय संबंध होते हे देशासमोर आले पाहिजे.’’ पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहूल चोक्सी सध्या भारतातून फरार आहे. 

तसेच राजीव गांधी फाऊंडेशनने कॅगच्या ऑडिटिंगला नकार का दिला. ही संस्था आरटीआयअंतर्गत का येऊ शकत नाही, ही माहिती समोर आली पाहिजे, अशी मागणीही नड्डा यांनी केली. नड्डा यांनी काल पंतप्रधान मदत कोषातील निधीही राजीव गांधी फाऊंडेशनकडे वळवण्यात आला होता, असा आरोप केला होता.

दरम्यान, भाजपाने यापूर्वी राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून देणगी मिळाल्याचा आरोप केला होता. चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला फंडिंग होत आहे. चीनचं इतकं प्रेम कसं वाढलं. काँग्रेस कार्यकाळातच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता.

याबाबत रविशंकर प्रसाद म्हणाले की, कायद्यानुसार कोणत्याही पक्षाला सरकारच्या परवानगीशिवाय परदेशी पैसे घेता येऊ शकत नाही. मग चीनकडून येणाऱ्या या पैशासाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का? हे स्पष्ट करावं. २००५-०६ मधील राजीव गांधी फाऊंडेशनच्या डोनरची यादी आहे. यात चीनच्या एम्बेसीकडून डोनेशन मिळाल्याचं स्पष्ट लिहिलं आहे. असं काय झालं? का गरज भासली? यात अनेक उद्योगपतींची, पीएसयू यांची नावे आहेत. इतकं असतानाही चीनच्या एम्बेसीकडून पैसे घ्यावे लागले असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण