शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

या राज्यात सर्व जागांवर काँग्रेस हरली होती, यावेळी काय होणार? शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान 

By विलास शिवणीकर | Updated: April 18, 2024 05:58 IST

राजस्थानात २५ पैकी १२ मतदारसंघांत १९ एप्रिल रोजी होणार मतदान 

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानात पहिल्या टप्प्यात २५ पैकी १२ लोकसभा मतदारसंघांत १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. गतवेळी भाजपने सर्वच्या सर्व २५ जागा जिंकल्या होत्या. यंदा या जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे. तर भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेसचे नेतेही सरसावले आहेत. पहिल्या टप्प्यात जयपूर शहर, जयपूर ग्रामीण, बिकानेर, श्रीगंगानगर, अलवर, झुंझुनूं, सीकर, चूरू, भरतपूर, नागौर, दौसा आणि करौली-धौलपूर या मतदारसंघांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात भाजपचे उमेदवार पंतप्रधान मोदींची गॅरंटी देत मत मागताना दिसून येत आहेत. मतदारांनी भाकरी फिरविली  होती...

राजस्थानच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारची कशी आवश्यकता आहे, हे भाजपकडून सांगितले जात आहे. राजस्थानात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाकरी फिरविली आणि काँग्रेसच्या हातून सत्ता भाजपकडे दिली. सत्ता गेल्याची निराशा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात दिसून येत आहे. तर राज्यात सत्ता आल्याने भाजपचे नेते, कार्यकर्ते यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

भाजपचा दरवेळी नवीन उमेदवारअलवरमधून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून आमदार ललित यादव रिंगणात आहेत. भरतपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या ८ पैकी ६ जागांवर भाजपचे आमदार आहेत. येथून रामस्वरूप कोली हे भाजपचे उमेदवार आहेत. गत तीन निवडणुकींत भाजपने येथे दरवेळी नवीन उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसने येथून संजना जाटव यांना संधी दिली आहे. 

अशोक गेहलोत यांचे इमोशनल कार्ड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे इमोशनल कार्ड वापरताना दिसत आहेत.त्यांचे चिरंजीव वैभव हे जालोर सिरोहीमधून मैदानात आहेत. आपल्या मुलाला आम्ही जनतेकडे सुपूर्द करत आहोत.त्याला कसे यशस्वी करायचे हे आता आपल्या हातातअसल्याची भावनिक साद ते घालत आहेत. 

मुख्यमंत्री शर्मा यांच्यापुढे आव्हान - राज्यातील सर्व जागा पुन्हा जिंकण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यापुढे आहे.- अर्थात, राजस्थानातही भाजपच्या प्रचारात चेहरा पंतप्रधान मोदी यांचाच आहे. 

वसुंधरा राजे स्टार प्रचारक - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या स्टार प्रचारक आहेत. - त्यांचे चिरंजीव दुष्यंत सिंह हे झालावाडमधून निवडणूक लढवीत आहेत. हा मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस