शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

4 राज्यांत काँग्रेसचं सरकार, पण एकही OBC सचिव नाही; राहुल यांच्या त्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 23:44 IST

राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत, काँग्रेस शासित राज्यांतील स्थितीसंदर्भात ट्विट केले आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान OBC आरक्षणावर भाष्य केले. यावेळी, त्यांनी दावा केला की, भारत सरकारमध्ये एकूण 90 सचिव आहेत. यांत केवळ तीन ओबीसी समुदायाचे आहेत आणि ते केवळ पाच टक्के बजेट नियंत्रित करतात. ते म्हणाले, "मी प्रश्न विचारला, जे 90 सचिव आहेत, जे भारत सरकार चालवतात. यांपैकी OBC किती आहेत? याच्या उत्तरानंतर मला आश्चर्य वाटले. कारण 90 पैकी केवळ 3 ओबीसी सचिव आहे." राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून आता भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पलटवार करत, काँग्रेस शासित राज्यांतील स्थितीसंदर्भात ट्विट केले आहे.

अमित मालवीय यांनी ट्विट करत म्हटले आहे, "काँग्रेसचे चार (राजस्थान, छतीसगड, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक) राज्यातं आजही सरकार आहे. मात्र, एकाही ठिकाणी ओबीसी चीफ सेक्रेटरी नाही. केवळ ज्ञानच देणार की काही करणारसुद्धा. तत्पूर्वी लोकसभेत अमित शाह यांनीही राहुल गांधीच्या वक्तव्यावर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले, महिला आरक्षणात ओबीसी कोट्याशिवाय हे विधेयक अपूर्ण आहे. तसेच सत्ताधारी पक्ष जात जनगणनेच्या मागणीवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अमित शाह यांनीही साधला निशाणा -शाह म्हणाले, "सरकार कॅबिनेट चालवते. ते म्हणाले की, जे लोक देश चालवतात, त्यांत केवळ तीन ओबीसी आहेत. माझ्या मते देश सरकार चालवते. देशाचे धोरण कॅबिनेट, संसद ठरवते. जर आकडेच हवे असतील, तर सांगतो, भाजपमध्ये 29 टक्के खासदार ओबीसी आहेत. 85 खासदार ओबीसी आहेत. तुलना करायची असेल तर या. 29 मंत्री ओबीसी आहेत. आम्ही ओबीसीमधूनच पंतप्रधान दिला आहे." 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाBJPभाजपा